एवढ मोठ आकाश जेव्हा छोट वाटत,
समुद्रातील पाणी सार हातात मावत,
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
श्वास घेण्यासाठी तो थांबून राहतो,
ती येणार नसेल तरीही तिचीच वाट पाहतो,
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
शब्दांनी सांगायचे ते डोळ्यांनी सांगतो,
डोळ्यांनी पहायचे मनाने पाहतो,
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
थंडीत जेव्हा पाऊस पडतो,
अन उन्हाळ्यात आपण कुडकुडतो,
असं जेव्हा वाटू लागत.
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
केव्हा समजावं प्रेम झालय,
असा जेव्हा प्रश्न पडेल, मन पाखरा सारख उडेल,
तेव्हाच समजावं कि खर प्रेम झालय
Saturday, December 11, 2010
Friday, December 10, 2010
प्रेम
मी तुझ्याबरोबर खेळतो
तेच मुळी हरण्यासाठी
तुझ्या गालावरल्या खळीत
हसु भरण्यासाठी!
प्रेम होतं किंवा केलं जातं
यावर पुर्वी पासुन वाद आहे
पण एक मात्र नक्की,
जो प्रेमात पडला...
तो वैयक्तिक जीवनात बाद आहे!
प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,
कारण गुणांपर्यत ठीक आहे,
दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!
तु कौलेजला आलीस की
माझी नजर तुझ्यावर खिळते
त्यातुनच पुढचं आयुष्य जगायची
स्फुर्ती मला मिळते!
तु इतकी सुंदर आहेस की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल!
प्रेमे मिळणं ही सुध्दा
एक कला आहे,
पण मी प्रेम मिळवु शकलो नाही
याचं दु:ख मला आहे!
शाळेत मुलीच्या बाजुला बसणं
ही आमच्यावेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावं
ही माझी छोटीसी अपेक्षा होती!
चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहली फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!
कौलेजच्या कट्ट्यावर मुलींना छेडणं
हा जणु काही आमचा खेळ होता
परीक्षेच्या दिवसातही ह्या गोष्टींसाठी
प्रेत्येकाकडे बराच वेळ होता!
प्रेमभंग म्हणजे
मुका मार आहे,
जखमा दिसत नसल्यातरी
वेदना फार आहे!
तेच मुळी हरण्यासाठी
तुझ्या गालावरल्या खळीत
हसु भरण्यासाठी!
प्रेम होतं किंवा केलं जातं
यावर पुर्वी पासुन वाद आहे
पण एक मात्र नक्की,
जो प्रेमात पडला...
तो वैयक्तिक जीवनात बाद आहे!
प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,
कारण गुणांपर्यत ठीक आहे,
दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!
तु कौलेजला आलीस की
माझी नजर तुझ्यावर खिळते
त्यातुनच पुढचं आयुष्य जगायची
स्फुर्ती मला मिळते!
तु इतकी सुंदर आहेस की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल!
प्रेमे मिळणं ही सुध्दा
एक कला आहे,
पण मी प्रेम मिळवु शकलो नाही
याचं दु:ख मला आहे!
शाळेत मुलीच्या बाजुला बसणं
ही आमच्यावेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावं
ही माझी छोटीसी अपेक्षा होती!
चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहली फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!
कौलेजच्या कट्ट्यावर मुलींना छेडणं
हा जणु काही आमचा खेळ होता
परीक्षेच्या दिवसातही ह्या गोष्टींसाठी
प्रेत्येकाकडे बराच वेळ होता!
प्रेमभंग म्हणजे
मुका मार आहे,
जखमा दिसत नसल्यातरी
वेदना फार आहे!
एक मैत्रिण
एक मैत्रिण आहे माझी...
माझ्या सोबत हसणारी
मी रडल्यावर मात्र...... माझे डोळे पुसणारी
एक मैत्रिण आहे माझी...
नेहमी सलवार-कमीज़ घालणारी
साधेपणातच सौंदर्य आहे.... हे सिद्ध करणारी,
एक मैत्रिण आहे माझी...
हिशोबिपणे वागणारी,
तिच्या या सवयीमुळे.....माझे पैसे वाचवणारी,
एक मैत्रिण आहे माझी...
कठोरतेने वागणारी,
जरा ओरडलो की मात्र..... मुसू मुसू रडणारी,
एक मैत्रिण आहे माझी...
माझ्यावर सारखी चिडणारी,
न कळत मात्र.... माझ आयुष्य फुलवणारी,
एक मैत्रिण आहे माझी...
सर्वाना हवीहवीशी वाटणारी,
माझ्याशिवाय मात्र.... स्वतःला अपूर्ण मानणारी
माझ्या सोबत हसणारी
मी रडल्यावर मात्र...... माझे डोळे पुसणारी
एक मैत्रिण आहे माझी...
नेहमी सलवार-कमीज़ घालणारी
साधेपणातच सौंदर्य आहे.... हे सिद्ध करणारी,
एक मैत्रिण आहे माझी...
हिशोबिपणे वागणारी,
तिच्या या सवयीमुळे.....माझे पैसे वाचवणारी,
एक मैत्रिण आहे माझी...
कठोरतेने वागणारी,
जरा ओरडलो की मात्र..... मुसू मुसू रडणारी,
एक मैत्रिण आहे माझी...
माझ्यावर सारखी चिडणारी,
न कळत मात्र.... माझ आयुष्य फुलवणारी,
एक मैत्रिण आहे माझी...
सर्वाना हवीहवीशी वाटणारी,
माझ्याशिवाय मात्र.... स्वतःला अपूर्ण मानणारी
Thursday, December 9, 2010
"माझे पहिले प्रेम"
"माझे पहिले प्रेम"
*माझे पहिले प्रेम
माझे पहिले प्रेम म्हनजे
जनु पोरकटपनाच होता
पन
त्या दिवसामधला
त्याचा रंगच भारी होता
प्रेमाच्या त्या वाटेवर
आमची
पावले पडत होती
पन त्या वाटेवर तेव्हा
गर्दी थोडी जास्तच होती
पहिल्या
वेळेस पाहिले
तेव्हाच ती मनात भरुन गेली
हिच्यापेक्शा दुसरी सुंदर
नसेल
अशी शंका येउन गेली
काही दिवसातच दोघांची
नजरानजर झाली
तिच्या
एका नजरेने
आमची छाती धडकुन गेली
काही दिवसांनी ही गोष्ट
सगळी कडे
पसरत गेली
मित्र म्हने याला अचानक
प्रेमाची हुकी कशी आली ?
रात्र
रात्र तिच्या आठवनीत
आम्ही प्रेमपत्रे लिहित होतो
होकार मिळेल की
नकार
एवढाच फ़क्त विचार करीत होतो
करुन धाडस जेव्हा तीला
आम्ही
प्रेमपत्र दिले
मित्रानी तेव्हा सांगितले
आता तुझे नाही खरे
तेव्हा
कळले की हीचे आधीच
बाहेर दहा प्रकरन आहेत
मुलांना फ़िरवन्याचे हिचे
तंत्र
जुने आहे
आम्हाला आवडलेली रानी
नेहमी दुसरय़ाचीच असते
आमच्या महालात
रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते.
*माझे पहिले प्रेम
माझे पहिले प्रेम म्हनजे
जनु पोरकटपनाच होता
पन
त्या दिवसामधला
त्याचा रंगच भारी होता
प्रेमाच्या त्या वाटेवर
आमची
पावले पडत होती
पन त्या वाटेवर तेव्हा
गर्दी थोडी जास्तच होती
पहिल्या
वेळेस पाहिले
तेव्हाच ती मनात भरुन गेली
हिच्यापेक्शा दुसरी सुंदर
नसेल
अशी शंका येउन गेली
काही दिवसातच दोघांची
नजरानजर झाली
तिच्या
एका नजरेने
आमची छाती धडकुन गेली
काही दिवसांनी ही गोष्ट
सगळी कडे
पसरत गेली
मित्र म्हने याला अचानक
प्रेमाची हुकी कशी आली ?
रात्र
रात्र तिच्या आठवनीत
आम्ही प्रेमपत्रे लिहित होतो
होकार मिळेल की
नकार
एवढाच फ़क्त विचार करीत होतो
करुन धाडस जेव्हा तीला
आम्ही
प्रेमपत्र दिले
मित्रानी तेव्हा सांगितले
आता तुझे नाही खरे
तेव्हा
कळले की हीचे आधीच
बाहेर दहा प्रकरन आहेत
मुलांना फ़िरवन्याचे हिचे
तंत्र
जुने आहे
आम्हाला आवडलेली रानी
नेहमी दुसरय़ाचीच असते
आमच्या महालात
रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते.
थोडासा थांब
थोडासा थांब.........
| | ||||||
| कुठेपर्यंत आले आहे मी | ||||||
| तुझ्या सोबत तुझ्या नकळत | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| हे डोळे फक्त तुझीच वाट बघत आहे रात्रदिवस | ||||||
| थकलेत् रे ते | ||||||
| त्याना एकदा अलगद तुझ्या ओठानी पुसून तर जा जरा | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| तुझ्या नसन्याने तुझ्या असण्याचे महत्व कळला आहे मला | ||||||
| तुझ असण पुन्हा एकदा देऊन तर जा जरा | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| तुझ काम, तुझ घर, तुझे मित्र, तुझ विश्व | ||||||
| सगळ सगळ मान्य मला | ||||||
| पण इथे कुणीतरी तुझ्यासाठी एक जग उभ केलय | ||||||
| ते बघून तर जा जरा | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| हा चंद्र सुद्धा हसतो मला | ||||||
| म्हणतो, ज्याला तू आमच्यात शोधत असत्तेस रात्र रात्र | ||||||
| तोही तुझ्यासाठी झुरततोय का असाच | ||||||
| त्या चंद्राला उत्तर देऊन तर जा जरा | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| आठवण तुलाही येते माझी | ||||||
| पापणी तुझी ही ओलवते अश्रूनी | ||||||
| त्या अश्रूना माझ्या ओंज़ळीत देवून तर जा जरा | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| तुझ हसण तुझ बोलण | ||||||
| तुझा राग तुझ गप्प राहण | ||||||
| घेऊन गेलास तुझ्याबरोबर तू सर्व | ||||||
| ज़गण्यासाठी तेवढेच आहे रे माझ्याकडे | ||||||
| माझ जगण देऊन तर ज़ा जरा... | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| माझ्या ज़वळ थोडा बसतर जरा | ||||||
| माझा सहवास, माझा श्वास, माझी सोबत | ||||||
| अनुभव तर जरा | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| प्रेमात म्हणे न सांगता न बोलता | ||||||
| सर्व काही कळत | ||||||
| मग न सांगता न बोलता | ||||||
| मला समजून तर घे जरा | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| तुझ्यात स्वत:लाच हरवून | ||||||
| बसले मी कुठेतरी | ||||||
| जरा येऊन मला माझेपन | ||||||
| शोधून तर दे जरा | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| माझ्या दिवसात, माझ्या रात्रीत | ||||||
| माझ्या प्रत्येक क्षणात तू आहेस | ||||||
| व्यापून टाकल आहेस तू मला | ||||||
| माझा एक एक क्षण | ||||||
| मला परत देऊन तर जा जरा | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| एकदा, फक्त एकदाच माझ्या मनात डोकवून तर जा | ||||||
| स्वता:लाच बघितल्यावर कस वाटत | ||||||
| ते सांगून तर जा जरा... | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| अळुवा वरच्या थेंबासारखा आहे रे हे आयुष्य... क्षणभंगुर | ||||||
| कुणी ते पाण हलवण्या आधी आणि तो इवलसा थेंब कुठेतरी लुप्त होण्याआधी | ||||||
| एकदा प्रेम करुन तर जा जरा... | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| शेवटचा थोडासा थांब | ||||||
| कसलीही अपेक्षा नाही... की कासलही बंध नकोत | ||||||
| प्रेम केल आहे तुझ्यावर... त्यात कसले व्यवहार नकोत | ||||||
| भावनाच फक्त कळतात रे मला | ||||||
| त्याचा पलिकडचे काहीही नको | ||||||
| एकदा त्या भावनाना स्पर्शून तर जा जरा | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
| ह्या वेडीला थोडस शहाणपण शिकवून तर जा जरा. | ||||||
| थोडासा थांब बघतर जरा | ||||||
आयुष्य कसं असतं?
मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?
पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?
पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्याला फुलविण्याचा
आयुष्य कसं असतं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?
पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?
पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्याला फुलविण्याचा
कधी कधी आयुष्य असच रेटत असताना अगदी थकायला होतं. आपलं aim , ambition असच राहून जातं नि मग आतून एक आवाज येतो, तो कुणाला गुरु सारखा येतो, कुणाला मार्गदर्शाकासारखा तर कुणाला अगदी मित्रा सारखा कि "जग साल्या जग".
जग साल्या जग,
अंगात रग असेल तोवर जग.
पाठीवरती घेऊन आभाळ, पुन्हा आभाळालाच बघ.....,
जग साल्या जग.
धावत जाऊन सुर्यापाशी मुठभर त्याचे तेज आण,
आणि मग जीवनाच्या ज्योतीला सांग,हवे तसे तग....,
इतका प्रचंड वेग आण नि वादळाहून तेज हो,
तुला आडवणाऱ्या पर्वतांची राख, क्षणात होईल मग....
कडाड असे संकटांवर कि करतील त्याच याचना,
कोसळणाऱ्या विजेलाही उघड्या छाताडाने बिलग....,
इतक जाळ स्वतःला कि संपूर्ण राख होईल,
उरलेल्या निखार्यांचीही हि आगेलाच लागेल धग.....,
काबीज कर एक एक तर नि अंतरीक्ष सारा,
डोईवर तू असशील त्यांच्या नि तुझ्या पायाखाली ढग....,
जग इतक अर्थपूर्ण कि वेदांच्या ओवीतून तू उमग,
विशाल हो इतक कि सागराच्या तहानेलाही लागेल तुझी तगमग...
जग असा होऊन निडर कि आदर्श होशील जगण्याचा,
नंतर देवही येऊन सांगेल हाच माझा खरा जिवलग.....,
जग साल्या जग... अंगात रग असेल तोवर जग.....
अंगात रग असेल तोवर जग.
पाठीवरती घेऊन आभाळ, पुन्हा आभाळालाच बघ.....,
जग साल्या जग.
धावत जाऊन सुर्यापाशी मुठभर त्याचे तेज आण,
आणि मग जीवनाच्या ज्योतीला सांग,हवे तसे तग....,
इतका प्रचंड वेग आण नि वादळाहून तेज हो,
तुला आडवणाऱ्या पर्वतांची राख, क्षणात होईल मग....
कडाड असे संकटांवर कि करतील त्याच याचना,
कोसळणाऱ्या विजेलाही उघड्या छाताडाने बिलग....,
इतक जाळ स्वतःला कि संपूर्ण राख होईल,
उरलेल्या निखार्यांचीही हि आगेलाच लागेल धग.....,
काबीज कर एक एक तर नि अंतरीक्ष सारा,
डोईवर तू असशील त्यांच्या नि तुझ्या पायाखाली ढग....,
जग इतक अर्थपूर्ण कि वेदांच्या ओवीतून तू उमग,
विशाल हो इतक कि सागराच्या तहानेलाही लागेल तुझी तगमग...
जग असा होऊन निडर कि आदर्श होशील जगण्याचा,
नंतर देवही येऊन सांगेल हाच माझा खरा जिवलग.....,
जग साल्या जग... अंगात रग असेल तोवर जग.....
मी
मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...
अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नाहीतर नीघून जा...
पुरणपोळी चाख्रतो मी, तंगडीदेखील तोडतो मी.
हिंदी सिनेमे पाहतो मी, विंग्रजीसुद्धा झाडतो मी,
या हीरोला मात्र तोड नाही एवढेच फक्त मानतो मी.
शिव्या सुद्धा देतो मी, कविता देखील करतो मी,
कधी कुणालाही हरवतो मी, कधी जिंकता जिंकता हरतो मी.
अध्यात्मावर बोलतो मी, फ्लर्टिंगसुद्धा करतो मी,
मी मी करतो मी, कधी सेल्फलेस देखील होतो मी.
प्रेम करत नाही कुणी म्हणून डिप्रेस्स सुद्धा होतो मी,
स्वःतालाच समजावतो मग, "नाही रे, त्यांच्याच नशिबात नाही मी!"
कधी देवाशी बोलतो मी, कधी मौनाला धरतो मी,
जिवलग एखादा चुकलाच तर लेक्चर सुद्धा झाडतो मी.
प्रश्न सगळ्या जगाचे सोडवायला, नेहमीच असतो उत्सुक मी,
स्वःताचे प्रश्न सोयीने मात्र, अनुत्तरीतच ठेवतो मी.
" आपलं आयुष्य वेगळं, आपली दुःख वेगळी!"
नेहमी स्वःताच्याच कक्षेत फिरतो मी.....
सभोवती मात्र जेव्हा, असहाय्य दीन पाहतो मी,
ख्ररच, स्वःताला खूप भाग्यवंत समजतो मी.
मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...
अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नाहीतर नीघून जा...
पुरणपोळी चाख्रतो मी, तंगडीदेखील तोडतो मी.
हिंदी सिनेमे पाहतो मी, विंग्रजीसुद्धा झाडतो मी,
या हीरोला मात्र तोड नाही एवढेच फक्त मानतो मी.
शिव्या सुद्धा देतो मी, कविता देखील करतो मी,
कधी कुणालाही हरवतो मी, कधी जिंकता जिंकता हरतो मी.
अध्यात्मावर बोलतो मी, फ्लर्टिंगसुद्धा करतो मी,
मी मी करतो मी, कधी सेल्फलेस देखील होतो मी.
प्रेम करत नाही कुणी म्हणून डिप्रेस्स सुद्धा होतो मी,
स्वःतालाच समजावतो मग, "नाही रे, त्यांच्याच नशिबात नाही मी!"
कधी देवाशी बोलतो मी, कधी मौनाला धरतो मी,
जिवलग एखादा चुकलाच तर लेक्चर सुद्धा झाडतो मी.
प्रश्न सगळ्या जगाचे सोडवायला, नेहमीच असतो उत्सुक मी,
स्वःताचे प्रश्न सोयीने मात्र, अनुत्तरीतच ठेवतो मी.
" आपलं आयुष्य वेगळं, आपली दुःख वेगळी!"
नेहमी स्वःताच्याच कक्षेत फिरतो मी.....
सभोवती मात्र जेव्हा, असहाय्य दीन पाहतो मी,
ख्ररच, स्वःताला खूप भाग्यवंत समजतो मी.
मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून
Wednesday, December 8, 2010
मैत्री
मैत्री
मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण
कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक
मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे
मैत्री
मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण
कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक
मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे
मैत्री
आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
तुझे प्रत्येक दुखह मला देऊन
सुखात माझ्या येशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
एकांत भासेल जेव्हा तुला
बोलावून मला घेशील का
थरथरनारया तुझ्या श्वासाने
ह्रदय माझे जपशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
तुझ्या हृदयातील प्रत्येक गोष्ट
तुझ्या कोवळया ओठांवर आनशील का
प्रत्येक वेळेस डोळ्यातून बोलण्याएवजी
आता तरी हो म्हणशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
स्वप्नातल्या राजकुमारी बरोबर
replace मला करशील का
आणी ह्या वेडीच्या आयुष्यात
राजकुमार म्हणून अवतरशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
हात माझा धरशील का
तुझे प्रत्येक दुखह मला देऊन
सुखात माझ्या येशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
एकांत भासेल जेव्हा तुला
बोलावून मला घेशील का
थरथरनारया तुझ्या श्वासाने
ह्रदय माझे जपशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
तुझ्या हृदयातील प्रत्येक गोष्ट
तुझ्या कोवळया ओठांवर आनशील का
प्रत्येक वेळेस डोळ्यातून बोलण्याएवजी
आता तरी हो म्हणशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
स्वप्नातल्या राजकुमारी बरोबर
replace मला करशील का
आणी ह्या वेडीच्या आयुष्यात
राजकुमार म्हणून अवतरशील का
आयुष्याच्या या गर्दित
हात माझा धरशील का
तुझ्या नकळत तुझ्यावर प्रेम करणारा मी एकटाच असेन ! ! !
तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण,
" ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !
तुला हसवणारे बरेच असतील पण,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !
लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !
हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण,
तू रडताना,तुझा हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !
तुला काळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझ्यावर प्रेम करणारा मी एकटाच असेन ! ! !
" ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !
तुला हसवणारे बरेच असतील पण,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !
लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !
हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण,
तू रडताना,तुझा हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !
तुला काळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझ्यावर प्रेम करणारा मी एकटाच असेन ! ! !
Tuesday, December 7, 2010
मैत्री
नात्यापलीकडचे नाते जपायचे
असते
त्याकरिता शब्दांची गरज
नसते
अशा निशब्द नात्यालाच
मैत्री म्हणतात !!१!!
नात्यालाही एक अनाम अर्थ
असतो
तो शोधायची गरज नसते
अचानक सापडलेल्या सुंदर
भावनेलाच मैत्री म्हणतात !!
२!!
कुणीतरी कुणाला तरी भेटते
एका क्षणात आपलेसे होते
त्या अकस्मात भेटीलाच
मैत्री म्हणतात !!३!!
तुझी माझी अशीच मैत्री आहे
दुराव्यात
ही जवलिकिची खात्री आहे.
ह्या विश्वासालाच
मैत्री म्हणतात !!४!!
तुला हे सारे कलते तरी वलत
नाही
कितीही नाही म्हटले तरी
तुझ्याशिवाय मला करमत नाही
अरे,या बैचैनिलाच तर
मैत्री म्हणतात !!५!!
आता तरी तुला कलले
ना मैत्री म्हणजे काय
की अजूनही काही बाकि आहे
अरे नाही नाही म्हणुन परत
बोलण्यालाच
मैत्री म्हणतात !!६!!
असते
त्याकरिता शब्दांची गरज
नसते
अशा निशब्द नात्यालाच
मैत्री म्हणतात !!१!!
नात्यालाही एक अनाम अर्थ
असतो
तो शोधायची गरज नसते
अचानक सापडलेल्या सुंदर
भावनेलाच मैत्री म्हणतात !!
२!!
कुणीतरी कुणाला तरी भेटते
एका क्षणात आपलेसे होते
त्या अकस्मात भेटीलाच
मैत्री म्हणतात !!३!!
तुझी माझी अशीच मैत्री आहे
दुराव्यात
ही जवलिकिची खात्री आहे.
ह्या विश्वासालाच
मैत्री म्हणतात !!४!!
तुला हे सारे कलते तरी वलत
नाही
कितीही नाही म्हटले तरी
तुझ्याशिवाय मला करमत नाही
अरे,या बैचैनिलाच तर
मैत्री म्हणतात !!५!!
आता तरी तुला कलले
ना मैत्री म्हणजे काय
की अजूनही काही बाकि आहे
अरे नाही नाही म्हणुन परत
बोलण्यालाच
मैत्री म्हणतात !!६!!
'नातं ' म्हणजे ओझं नाही
मुके झाले ओठ तरी डोळ्यांनी तू बोलून जा,
जाता जाता माझ्या मनात एखादं मोरपिस ठेवून जा,
बोलायचं नसलं माझ्याशी तर,हात तरी हालवून जा,
माझ्यासाठी निदान स्वतःची समजुत तरी घालून जा,
जाणार आहेस तू तर,अंगणात क्षणभर थांबून जा,
अन् अश्रू ढाळून निरोपाची,रीत तरी, पाळून जा,
एवढं करणार नसशील तर,ओल्या आठवणी ठेवून जा,
अन् ह्रदयावर विरहाचे खिळे ठोकून
जगण्याची शपथ तरी घालून जा......
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.
जाता जाता माझ्या मनात एखादं मोरपिस ठेवून जा,
बोलायचं नसलं माझ्याशी तर,हात तरी हालवून जा,
माझ्यासाठी निदान स्वतःची समजुत तरी घालून जा,
जाणार आहेस तू तर,अंगणात क्षणभर थांबून जा,
अन् अश्रू ढाळून निरोपाची,रीत तरी, पाळून जा,
एवढं करणार नसशील तर,ओल्या आठवणी ठेवून जा,
अन् ह्रदयावर विरहाचे खिळे ठोकून
जगण्याची शपथ तरी घालून जा......
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.
Subscribe to:
Comments (Atom)