तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण,
" ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !
तुला हसवणारे बरेच असतील पण,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !
लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !
हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण,
तू रडताना,तुझा हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !
तुला काळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण ,
तुझ्या नकळत तुझ्यावर प्रेम करणारा मी एकटाच असेन ! ! !
No comments:
Post a Comment